पुणे – टंचाई आराखड्यात वाढ

पुरवणी टंचाई आरखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

पुणे – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र होत असून, तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या टंचाई बैठकांमधून नागरिकांकडून विविध मागण्या करण्यात आला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंजुर केलेल्या टंचाई आराखड्यात वाढ करावी लागली असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पुरवणी टंचाई आरखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषदेकडून 30 कोटी 75 लाख 52 हजार रुपयांचा पुरवणी आराखडा तयार केला आहे. पूर्वीच्या मुळ आरखड्यासह आताच्या पुरवणी आराखड्यामुळे जिल्ह्याला 95 कोटी 81 लाख 12 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे चिन्हे दिसून आल्याने प्रशासनाने जूनपर्यंतचे टंचाईचे नियोजन केले आहे. मार्चनंतर दुष्काळाची स्थिती गंभीर होऊन पाणी टंचाई आवाक्‍याबाहेर जाईल, ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई पुरवणी आराखडा तयार केला आहे. त्यात नळ दुरुस्ती योजना, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विंधन विहीरी, विंधन विहीरींची दुरुस्ती, विहीरींचे अधिग्रहण, विहीरींचे खोलीकरण यासह विविध कामे केली जाणार आहेत.

जिल्ह्याचा मूळ टंचाई आराखडा 65 कोटी 5 लाख 60 हजार रुपयांचा आहे. परंतु, मागील महिन्यात जिल्ह्यात घेतलेल्या टंचाई बैठकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी समस्या मांडल्या. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनानुसार अभियंता सुरेंद्र कदम यांनी पुरवणी आराखडा तयार केला आहे. या पुरवणी आराखड्यामुळे जिल्ह्यातील पूर्वीच्या आराखड्यांतील कामांव्यतिरीक्त 226 गावे आणि 1 हजार 146 वाड्या-वस्त्यांधील 1 हजार 378 कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

पुरवणी आराखड्यात तालुक्‍यांमधील भीषण टंचाई पाहून प्रत्येक तालुक्‍यातील विविध कामांसाठी निधीसाठी मुंजरी दिली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी : आंबेगाव 65 लाख 5 हजार रुपये, बारामती 5 कोटी 84 लाख 50 हजार, भोर 3 कोटी 80 लाख 16 हजार, दौंड 83 लाख 40 हजार, हवेली 86 लाख 50 हजार, इंदापुर 2 कोटी 49 लाख 36 हजार, जुन्नर 2 कोटी 28 लाख, खेड 1 कोटी 38 लाख 50 हजार, मावळ 4 कोटी 23 लाख 50 हजार, मुळशी 27 लाख 50 हजार, पुरंदर 5 कोटी 74 लाख 55 हजार, शिरूर 1 कोटी 20 लाख, वेल्हा 1 कोटी 14 लाख 50 हजार रुपये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)