पुणे – दोन दिवसांत 49 जणांनी नेले 80 अर्ज

कॉंग्रेसकडून तिघांनी नेले अर्ज

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान पुणे मतदारसंघासाठी दोन दिवसांत 49 जणांनी 80 अर्ज नेले आहेत. तर बारामतीमधून 35 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर कॉंग्रेसकडून अद्यापही उमेदवारी जाहीर झाली करण्यात आलेली नाही. मात्र कॉंग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, प्रवीण गायकवाड यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज नेले आहे.

पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी गुरुवारपासून (दि.28) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज नेण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी कॉंग्रेसकडून तीन उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. तर, गिरीश बापट यांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज नेला आहे. मात्र, दोन दिवसांत कोणत्याही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)