पुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून हिंदी विषयासाठी कॉपी करताना एकूण 15 विद्यार्थ्यांना पकडले आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांकडून एकाच वेळी परीक्षा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हिंदी विषयासाठी परीक्षा झाली. यात औरंगाबादमध्ये 8, कोल्हापूरमध्ये 2, नाशिकमध्ये 5 असे एकूण 15 विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत. इतर पुणे, नागपूर, मुंबई, अमरावती, लातूर, कोकण या विभागांत एकही गैरमार्गाचे प्रकरण आढळले नाहीत. दुपारच्या सत्रात जर्मन, अर्धमागधी, पर्शियन, अवेस्ता-पहलवी या विषयांच्या परीक्षत एकही कॉपीचे प्रकरण आढळले नाही, अशी माहिती राज्यमंडळाकडून मिळाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
15 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)