पुणे – काश्‍मिरी तरुणाला मारहाण

सर्वोच्च न्यायालयाकडून काश्‍मिरी तरुणांवरील हल्ल्याची गंभीर दखल

पुणे – दुचाकीची धडक लागल्याने एका काश्‍मिरी तरुणाला 2 ते 3 जणांच्या टोळक्‍याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी रात्री टिळक रस्त्यावर घडली. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त संघटनांकडून देशभरातील काश्‍मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेणे आवश्‍यक होती. मात्र, हद्दीचा वाद घालत संबंधित काश्‍मिरी तरुणाची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. याप्रकरणी संबंधित तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

मूळचा काश्‍मीर येथील तरुण शहरामध्ये एका वृत्तपत्रात डीटीपी सेक्‍शनमध्ये कार्यरत आहे. तो रात्री दुचाकीवरून घरी जात असताना, त्याच्या दुचाकीला समोरून एक दुचाकी घासली गेली. यानंतर वाद उफाळला, संबंधित तरुण हा काश्‍मिरी असल्याचे कळताच आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, काश्‍मीरी तरुणाने याची खबर नियंत्रण कक्षाला दिल्यावर स्वारगेट, खडक, दत्तवाडी, विश्रामबाग आदी पोलीस ठाण्यांची सुरुवातीला ही आपली हद्द नसल्याचे सांगत तक्रार दखल करण्यास टाळाटाळ केली. सरतेशेवटी संबंधित तरुणाची तक्रार स्वारगेट पोलिसांनी घेतली.

यासंदर्भात पोलीस उपायुक्‍त सुहास बावचे यांनी सांगितले की, संबंधित काश्‍मिरी तरुणाला मारहाण झाल्यानंतर त्याची तक्रार स्वारगेट पोलिसांनी घेतली आहे. मात्र, तो काश्‍मिरी आहे, म्हणून त्याला मारहाण करण्यात आली नाही. दुचाकींच्या झालेल्या घासाघासीतून ही मारहाण करण्यात आली आहे. यासंबंधी काही चुकीची माहिती प्रसारित होत आहे.

– सुहास बागवे

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त संघटनांकडून देशभरातील काश्‍मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. काश्‍मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक पावले उचलावीत, असे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारसह महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्‍मीर, हरयाणा, मेघालय, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना सुप्रीम कोर्टाने नोटिसा पाठवल्या आहेत. हिंसाचाराच्या घटनांच्या तपासासाठी नियुक्‍त केलेले नोडल ऑफिसर यांनीही काश्‍मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्‍चित करावी. नोडल ऑफिसरकडे काश्‍मिरी विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात, असे न्यायालयान म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)