पुणे – मेट्रोला जागा देण्यास स्थायीची मान्यता

17 जागा देणार : उद्याने, पदपथाची जागा

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पासाठी “महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (महामेट्रो) यांना पुणे महापालिकेच्या 3 हजार 14 चौरस मीटर जागा विना-निविदा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील एकूण 17 जागांचा समावेश आहे. या जागा महामेट्रोला 30 वर्षे कराराने 1 रुपया दराने देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या पहिल्या टप्प्यासाठी आवश्‍यक जागा पुणे मेट्रो प्रकल्पासाठी उपलब्ध करून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यात कोथरूड, शिवाजीनगर, सबर्बन, पुणे स्टेशन येथील उद्यानमधील जागांची मागणी केली होती. त्यात मेट्रो स्टेशनचे एन्ट्री-एक्‍झिट, लिफ्ट, फुट ओवर ब्रीज वापराकरिता कायमस्वरुपी उभारले जणार आहेत.
मेट्रोच्या कामाची तातडी आणि उपयुक्तता विचारात घेता महापालिकेच्या मालकीच्या जागा “महामेट्रो’ला त्वरीत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने महापालिकेच्या मालकीची जागा किमान चालू बाजारभावाने भाडेपट्टा अथवा विक्री करून देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. मिळकत वाटप नियमावली वगळता कोणत्याही मिळकतींचा विनियोग जाहीर निविदा मागवून करण्यात यावा, असे नमूद आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. त्यानुसार “महामेट्रो’ने महापालिकेच्या मालकीच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 17 जागा मागितल्या आहेत. आनंदनगर, कोथरूड उद्यान, पुलाची वाडी, सी.टी.एस, संभाजी उद्यान, शिवाजीनगर, महापालिका भवन, एलबीटी विभाग, ममता हॉटेलची जागा, बंडगार्डन, बालगंधर्व रंगमंदिर या जागांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)