पुणे – घरगुती सिलेंडरच्या स्फोटात दाम्पत्य जखमी

पुणे – घरगुती सिलेंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात ज्येष्ठ दाम्पत्य जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा स्फोट इतका भीषण होता की या इमारतीला तडे गेले असून शेजारच्या दुकानाचे पत्रेही उडाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि तीन गाड्यांनी अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत ही आग आटोक्‍यात आणली. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण ज्ञानेश्‍वर वाघचौरे (वय 60) आणि छाया लक्ष्मण वाघचौरे (वय 55, दोघेही रा. माऊली सावली, राजयोग सोसायटी, वारजे गावठाण) अशी या स्फोटात जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबतची हकिकत अशी, वाघचौरे हे त्यांच्या पत्नीसह या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर राहातात. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास छाया या स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या घरगुती सिलेंडरमधून गळती सुरू झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाघचौरे आणि त्यांच्या पत्नीने गॅसचा रेगुलेटर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये हे दोघेही जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेची माहिती मिळताच वारजे अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथ्रुडकर, मनोज साळुंके, संजय भोसले, बेंद्रे आणि महाले तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत ही आग आटोक्‍यात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)