गहुंजे मैदान भारतासाठी थोडी खुशी थोडा गम

पुणे : येथे आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. आता पर्यंत दोन सामन्यांमधिल पहिला सामना भारताने जिंकला आहे तर दुसरा सामना बरोबरीत सुटल्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी असलेल्या भारतीय संघासमोर सामन्यात विजय मिळवून ही आघाडी 2-0 अशी वाढविण्याचे आव्हान असणार आहे.

पुण्यामध्ये होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन आता गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होते. गेल्यावर्षी 23 फेब्रुवारी 2017 रोजी एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. हा पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि वेस्टइंडीज या उभय देशांत पुण्यात होणारा हा पहिलाच सामना ठरणार आहे. एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर याआधी झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने मिश्र कामगिरी केली आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरूध्द झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला होता.

त्यानंतर या वर्षी 15 जानेवारी 2017 रोजी इंग्लंड विरूध्द झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने सनसनाटी विजय मिळवला. या सामन्यात कर्णधर विराट कोहली आणि स्थानिक खेळाडू केदार जाधव यांनी धडाकेबाज शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. तर, न्युझिलंड विरूध्दचा सामना भारताने सहा गडी राखून जिंकला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)