पुणे – वन्यप्राण्यांसाठी हवेत स्वतंत्र कॉरिडॉर

वाघ, बिबट्यांच्या सुरक्षित विहारासाठी मागणी

पुणे – “राज्यातील बरेचसे विकास प्रकल्प विशेषत: महामार्ग प्रकल्प वनक्षेत्रातून जातात. दिवस-रात्र वाहतुकीमुळे वन्यप्राण्यांना संरक्षित क्षेत्र तर नाहीच, तसेच त्यांना सुरक्षितपणे वावरण्यासाठी वेगळे कॉरिडॉरदेखील नाहीत. त्यामुळे प्राण्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी स्वतंत्र कॉरिडॉर असावेत, अशी मागणी विविध प्राणी मित्र तसेच अभ्यासकांकडून केली जात आहे.

राज्यांत अनेक ठिकाणी वनक्षेत्रात अतिक्रमण होत आहे. त्यामुळेच मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढला आहे. बिबट्यासारखे वन्यप्राणी आता मानवी वस्तीच्या अगदी जवळ आल्याच्या चर्चादेखील घडत आहेत. त्याच वेळी अन्न व पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या प्राण्यांच्या अपघातातदेखील वाढ होत आहे. काही प्राणी गंभीर स्वरूपात जखमी होत आहेत, तर काहींचा मृत्युदेखील होतो. वनविभागाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात अपघातात मृत्यु पावलेल्या बिबट्यांची संख्या 24 आहे, तर वाघांची संख्या 3 आहे. इतर प्राण्यांच्या अपघाती मृत्युंचे प्रमाणही लक्षणीय आहे.

वन्यजीव अभ्यासक आणि भारतीय वन्यजीव सर्वेक्षण संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ अनिल महाबळ म्हणाले, “जंगल क्षेत्रात होणाऱ्या अतिक्रमणांमुळे तेथील प्राणी जंगलाच्या बाहेर पलायन करतात. त्यामुळे अशा प्राण्यांवर अवलंबून आसणाऱ्या इतर मोठ्या प्राण्यांना खाण्यासाठी अन्न उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांनादेखील जंगलातून बाहेर पडावे लागते. त्यातुनच वन्यप्राणी-मानव यांच्यात संघर्ष सुरू होतो. हे टाळण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी संरक्षित क्षेत्र असणे आवश्‍यक आहेत. तसेच या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप नसावा.’

बिबट्या हा प्रादेशिक प्राणी आहे. आपल्या प्रदेशाचा विस्तार वाढविण्यासाठी तसेच अन्न-पाण्याच्या शोधात तो लांबवर प्रवास करतो. इअतरही प्राणीदेखील अन्न अव पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. मात्र अनेकदा रस्ता ओलांडताना या प्राण्यांचा अपघात होतो. विशेषत: रात्री या अपघातांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच वन्यप्राण्यांच्या हालचालीसाठी सुरक्षित कॉरिडॉर असावेत.
– डॉ. विद्या अत्रेय, मानव- बिबट्या संघर्षाच्या अभ्यासक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)