पुणे – वैद्यकीय प्रवेशासाठी 29 लाख घेऊन फसवणूक

कॉंग्रेसचा पदाधिकारी, मीडिया सेलच्या व्यक्‍तीवर गुन्हा

पुणे – भारती विद्यापीठमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी 28 लाख 81 हजार रुपये घेऊन जलसंपदा खात्यातील एका अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कॉंग्रेसचे माजी पदाधिकारी मुकेश मधुकर धिवार आणि त्यांच्या मीडिया सेलचे श्रीकांत बापुराव शिर्के यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी देवपूर येथील एका 47 वर्षीय व्यक्‍तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे जलसंपदा विभागात कामाला आहेत. त्यांच्या मुलीला भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस व मेहुण्याच्या मुलास बीएएमएसला प्रवेश घ्यायचा होता. फिर्यादी यांचा मेव्हणा व श्रीकांत हे एकाच कंपनीत कामाला होते. यामुळे फिर्यादींची श्रीकांत याच्याशी ओळख झाली. श्रीकांत हा कडेगावचा असल्याने त्याने भारती विद्यापीठात ओळख असल्याचे सांगितले. तसेच, तो कॉंग्रेसच्या मीडिया सेलमध्ये कामाला आहे. यामुळे त्याने कॉंग्रेसचे पदाधिकारी मुकेश धिवार याच्यामार्फत अॅडमिशन मिळवून देण्याचे आश्‍वासन 2016 मध्ये दिले होते. एमबीबीएससाठी 30 लाख व बीएएमएससाठी 3 लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी 28 लाख 81 हजार रुपये घेण्यात आले. मात्र, पैसे घेऊनही ऍडमिशन देण्यात आले नाही. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. सूर्यवंशी करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)