पुणे – महापौर पदांसाठी आरक्षण सोडत जूनमध्ये

मुक्‍ता टिळक यांची मुदत दि.15 सप्टेंबरपर्यंत

पुणे – महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत जूनमध्ये असून, पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक यांची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. येत्या जूनमध्ये महापौर पदाची सोडत मुंबईमध्ये होणार आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व महापालिकांच्या आरक्षणांची सोडत होणार आहे.

पुणे महापालिकेत संपूर्ण सत्ता भाजपची असल्याने पुढील महापौर साहजिकच भाजपचाच होणार आहे. परंतु कोणते आरक्षण पडणार आहे, हे या सोडतीनंतरच समजणार आहे. भाजपकडून सव्वा-सव्वा वर्षांसाठी हे पद दिले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापौर मुक्ता टिळक यांना संपूर्ण अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. ती मुदत दि.15 सप्टेंबरला संपणार आहे. त्या कालावधीत विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. मात्र, या निवडीवर आचारसंहितेचा कोणताही प्रभाव राहणार नाही. त्यामुळे महापौर बदलाची प्रक्रिया आरक्षणानुसार पार पाडता येणार आहे.

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना, त्यांनी संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येकी सव्वा वर्षांचा कालावधी महापौर पदासाठी दिला होता. त्यामुळे चार जणांना महापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. भाजपने मात्र तो फॉर्म्युला वापरला नाही. खुल्या महिला गटाचे आरक्षण असल्याने टिळक यांना सिनियॉरिटीप्रमाणे महापौरपद देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)