केपी इलेव्हन, पुणेरी वॉरीयर्स संघांना विजेतेपद !!

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा

पुणे – व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल आणि प्रथम श्रेणी गटाचे केपी इलेव्हन संघाने आणि व्दितीय व तृतीय श्रेणी गटाचे पुणेरी वॉरीयर्स संघाने विजेतेपद संपादन केले. कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अव्वल आणि प्रथम श्रेणीच्या अंतिम सामन्यात निर्मल छेत्री याने केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर केपी इलेव्हन संघाने आयफा स्कॉय हॉक्‍स्‌ संघाचा 2-0 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

निर्मल याने सामन्याच्या दुसर्याच मिनिटाला गोल करून केपी इलेव्हन संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पुर्वार्ध संपण्यास एक मिनिट शिल्लक असताना निर्मल यानेच दुसरा गोल करून संघाला विजयी आघाडी मिळवून देत संघाचा विजय साकार केला.

व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटात विवेक घेइनंद याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर पुणेरी वॉरीयर्स संघाने फिनाक्‍यु गोग एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. अव्वल आणि प्रथम श्रेणी गटामध्ये केपी इलेव्हनच्या निर्मल छेत्री याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. केपी इलेव्हनच्या गुलशेर अन्सारी याला सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक तर, सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा मान दिएगो ज्युनिअर्सच्या बर्नाड परेरा याला देण्यात आला.

व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटात पुणेरी वॉरीयर्सच्या विवेक घेइनंद याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. फिनाक्‍यु गोगच्या अहान रेटेलू याला सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक तर, सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा मान पुणेरी वॉरीयर्सच्या ओंकार रसाळ याला देण्यात आला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेंट व्हिन्सेंटचे मुख्याध्यापक फादर फ्रान्सीस पाटेकर, रेक्‍टर आणि फादर केनिथ म्सिक्‍युटा आणि फादर ऍन्ड्रु फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक आणि व्होबाचे अध्यक्ष विक्रम केरींग आणि व्होबाचे उपाध्यक्ष नयन सामल, सचिव रिचर्ड फर्नांडिस आणि आथर मॉरेस आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजन आणि संयोजनामध्ये सेंट व्हिन्सेंट शाळेच्या 1988 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : अव्वल आणि प्रथम श्रेणीः केपी इलेव्हनः 2 (निर्मल छेत्री 2, 30 मि.) वि.वि. आयफा स्कॉय हॉक्‍सः 0;

व्दितीय आणि तृतीय श्रेणी गट : पुणेरी वॉरीयर्सः 1 (विवेक घेइनंद 9 मि.) वि.वि. फिनाक्‍यु गोग एफसीः 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)