गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग संघांची विजयी सलामी

पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धा

पुणे – गेट मेस्सी, कोक इन कॅन, झाल्टन ऑफ स्विंग, आऊट ऑन बेल, ड्युक्‍स ऑफ हजार्ड व मार्क ओ पिर्लो या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे सुरु असलेल्या पूना क्‍लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्‍लब फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी देत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

-Ads-

पूना क्‍लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ब्रेंडनने केलेल्या एका गोलाच्या जोरावर गेट मेस्सी संघाने ऑफ ओझील संघाचा 1-0 असा पराभव करत आगेकूच नोंदवली. तर, दुसऱ्या सामन्यात सुरज राठीने केलेल्या दोन गोला व यश लुंबा यांच्या एका गोलासह कोक इन कॅन संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा 3-1 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात निर्भय शर्माच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर ड्युक्‍स ऑफ हजार्ड संघाने रॉनी ट्यून्स संघाचा 3-2 असा पराभव केला.

सविस्तर निकाल – साखळी फेरी :

कोक इन कॅन -3 (सुरज राठी 3,7 मी, यश लुंबा 12मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस-1 (वेदांत मेहता 9मी).

झाल्टन ऑफ स्विंग -2 (अखलाक पुनावाला 7मी, गुनिश बेदी 14मी) वि.वि शुगर केन- 1(अर्णव लुल्ला 4मी).

गेट मेस्सी -1 (ब्रेंडन 13मी) वि.वि विझार्ड ऑफ ओझील-0.

आऊट ऑन बेल -4 (राहिल मर्चंदानी 7, 12मी, अक्षय चोपडा 9मी, कपिल सावंत 14मी) वि.वि सुअरेज बाईट्‌स- 2(वेद जैन 5मी, आदित्य गांधी 11मी).

ड्युक्‍स ऑफ हजार्ड – 3 (निर्भय शर्मा 4,7,10मी) वि.वि रॉनी ट्यून्स – 2(रोहित जाधव 6,13मी).

मार्क ओ पिर्लो – 4 (अमजद अक्कलकोटकर 4, 7, 10, 14मी) वि.वि रोनाल्डो नट्‌स-2 (कृष्णा जैन 3मी, राक्षय ठक्कर 12मी).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)