विद्याभवन स्कूलच्या संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला 

विद्याभवन करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा 

पुणे : विद्याभवन स्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय तर्फे आयोजित विद्याभवन करंडक आंतरशालेय फुटबॉल (14 आणि 16 वर्षाखालील गट) स्पर्धेत विद्याभवन शाळेच्या दोन्ही संघाने विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

विद्या भवन हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात विद्या भवन संघाने सेंट जोसेफ, खडकी शाळेने 3-0 असा सहज विजय मिळवला. विद्याभवन शाळेकडून हर्ष धुमाळ याने एक तर, क्षितीज कोकाटे याने दोन गोल केले. अक्क्‌षीत दादू याने केलेल्या गोलाच्या जोरावर लॉयला स्कूलने सिम्बायोसिस स्कूलचा 1-0 असा सहज पराभव केला.

स्पर्धेचा सविस्त निकाल : 14 वर्षाखालील गट : 

1) विद्या भवनः 3 (हर्ष धुमाळ 4 मि., क्षितीज कोकाटे 11, 21 मि.) वि.वि. सेंट जोसेफ, खडकीः 0;
2) लॉयला स्कूलः 1 (अक्क्‌षीत दादू 24 मि.) वि.वि. सिम्बायोसिस स्कूलः 0;
16 वर्षाखालील गटः
1) विद्या भवनः 3 (श्रेयस जगतपा 5, 16, 20 मि.) वि.वि. भारती विद्या भवनः 0;
2) पुणे पब्लिक स्कूलः 4 (यश 19, आदर्श 22, कुणाल 25, रोहन 30 मि.) वि.वि. अभिनव विद्यालयाः 0;
3) सेंट ज्युड देहू रोडः 3 (रोहीत 4, 28 मि., जयेश गायकवाड 23 मि.) वि.वि. सेंट पॅट्रीकः 1 (ग्लाडसन डेव्हिड 30 मि.);
4) लॉयला हायस्कूलः 2 (अव्देत शिंदे 14 मि., संचित म्हस्के 15 मि.) वि.वि. एसएसपीएमएस डे स्कूलः 0;
5) सेंट व्हिन्सेंटः 4 (पार्थ राऊत 2, 4, 24 मि., अरनॉल्ड 5 मि.) वि.वि. सिम्बायोसिस स्कूलः 1 (साहील शिंदे 22 मि.);


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)