द ऑरबिस स्कूल, दस्तूर स्कूलची आगेकूच

पीडीएफए मैदान : सेंट व्हिन्सेंट हायस्कूल (ब्लू जर्सी) आणि सेंट अरनॉल्ड स्कूल यांच्यातील लढतीतील एक क्षण.

रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा

पुणे – द ऑरबिस स्कूल आणि दस्तूर हौशांग बॉइज हायस्कूल संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेत ज्युनियर मुलांच्या गटात विजयी आगेकूच नोंदवली आहे. ढोबरवाडी येथील पीडीएफएच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ज्युनियर मुलांच्या गटात धीर जोहरीच्या (12 मि.) गोलमुळे द ऑरबिस स्कूलने स्टेला मारिस स्कूलवर 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुस-या लढतीत दस्तूर स्कूलने एंजल मिकी मिनी स्कूलवर 5-0ने मात केली. यात घनश्‍याम पटेल (7, 35 मि.), तबिश सुंडके (33, 40 मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर नदीम शेखने (2 मि.) एक गोल केला. कॉलेज बॉइज गटात पूना कॉलेजने सिंहगड अकॅडमीवर 1-0ने मात केली. यात विजयी गोल मयूर शेलारने (49 मि.) केला. लीग गटात नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सेंट पॅट्रिक्‍स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्यातील लढत 0-0 बरोबरीत सुटली.

सविस्तर निकाल –

ज्युनियर मुले लीग – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल 4 (अमिर आदम 3, 5 मि., दानिश चंदार्गी 10 मि, भार्गव सावंत 48 मि.) वि. वि. सेंट अरनॉल्ड स्कूल 0, द ऑरबिस स्कूल 1 (धीर जोहरी 12 मि.) वि. वि. स्टेला मारिस स्कूल 0, सरदार दस्तूर हौशांग बॉइज हायस्कूल 5 (नदीम शेख 2 मि., घनश्‍याम पटेल 7, 35 मि., तबिश सुंडके 33, 40 मि.) वि. वि. एंजल मिकी मिनी स्कूल 0.

कॉलेज बॉइज लीग – नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स 0 बरोबरी वि. सेंट पॅट्रिक्‍स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज 0, दुसरी फेरी पूना कॉलेज ऑफ एसीएस 1 (मयूर शेलार 49 मि.) वि. वि. सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग 0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)