कमांडोज्‌ एफसी, दिएगो ज्युनिअर्स एफसी संघांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा

पुणे – व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेच्या कमांडोज्‌ एफसी, दिएगो ज्युनिअर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांच्या पराभव करून तिसर्या फेरीत प्रवेश केला. यांसह सासवड एफसी, नॉईज बॉईज, केशव माधव प्रतिष्ठान, शिवाजीयन्स्‌ एससी आणि पुणे वॉरीयर्स या संघांनी आपली विजयी घौडदौड कायम ठेवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अव्वल आणि प्रथम श्रेणी गटात ऍग्नल पी. आणि अशोक एस. यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर कमांडोज्‌ एफसी संघाने सिटी क्‍लब संघाचा 2-0 असा सहज पराभव करून पुढील फेरी गाठली. शुभम महापाडी याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर दिएगो ज्युनिअर्स संघाने घोरपडी यंग वन्स्‌ संघाचा 4-3 असा पराभव केला. अतितटीच्या झालेल्या या सामन्यात पूर्णवेळात 7 गोल करण्यात आले. यामध्ये दिएगोच्या शुभम महापाडी याने पुर्वार्धात एक आणि उत्तरार्धात दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. शेफरे पेरीएरा याने एक गोल केला. घोरपडी यंग वन्स्‌ संघाकडून नेल्सन जोसेफ, ऋतुराज पाटील व मनप्रीत एस. यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

सविस्तर निकाल :

अव्वल आणि प्रथम श्रेणी : दुसरी फेरी – कमांडोज एफसीः 2 (ऍग्नल पी. 8 मि. पेनल्टी, अशोक एस. 51 मि.) वि.वि. सिटी क्‍लबः 0, दिएगो ज्युनिअर्सः 4 (शुभम महापाडी 5, 56, 58 मि., शेफरे पेरीएरा 45 मि.) वि.वि. घोरपडी यंग वन्सः 3 (नेल्सन जोसेफ 6 मि., ऋतुराज पाटील 18 मि., मनप्रीत एस. 53 मि.).

व्दितीय आणि तृतीय श्रेणी गट : दुसरी फेरी –

सासवड एफसीः 5 (इम्रान शेख, शोएब शेख, ओंकार नाळे, संग्मीत्र मिसाळ, हृषीकेश खेडेकर) टायब्रेकमध्ये वि.वि. डायनामाईटस्‌ एफसीः 4 (सुमित उत्तेकर, यश पाटील, आशुतोष के., रजनीथ पिल्लई); गोल चुकविला- विशाल पोलकाम; पूर्ण वेळ 0-0, नॉईज बॉईजः 2 (स्वप्निल चाल्कस्‌ 21 मि., हर्ष उत्तेकर 32 मि.) वि.वि. रेंजहिल्स्‌ यंग बॉईजः 1 (साईचवन आर. 15 मि.), केशव माधव प्रतिष्ठान (केएमपीएल)ः 5 (नविन बी. 36 मि., फरदीन शेख, पॉल फलेरो, अनिकेत पुजारी, राज पुकारी) टायब्रेकमध्ये वि. आर्यन्स्‌ एफसीः 2 (तेजस कदम 5 मि., निखील डुचे);(गोल चुकविलेः ओम शेळके, आदर्श राऊत); पूर्ण वेळ 1-1. शिवाजीयन्स्‌ एफसीः 2 (सर्वेश देशपांडे 15, 39 मि.) वि.वि. एएफए सॅनफोर्डः 0, पुणेरी वॉरीयर्स एफसीः 2 (सौरभ दौंड 11 मि., राहूल कड 36 मि.) वि.वि. डेक्कन इलेव्हन कः 1 (गंधार एस. 40 मि.).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)