केपी इलेव्हन, शिवाजीयन्स्‌ एससी, डेक्कन इलेव्हन एफसी संघांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा

पुणे – केपी इलेव्हन, शिवाजीयन्स्‌ एससी, डेक्कन इलेव्हन एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांच्या पराभव करताना व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या केपी इलेव्हन संघाने युकेएम कोथरूड एफसी संघाचा 4-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. अल्फ्रेड नागल याने दोन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. यांसह अड्‌व्व्विवन फलेरो आणि रोमारीओ लाझारथ यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

आयुश शेट्टी याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर शिवाजीयन्स्‌ एससी संघाने गनर्स एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. डेक्कन इलेव्हन एफसी संघाने रूपाली एफसीस संघाचा 3-0 असा सहज पराभव करून तिसरी फेरी गाठली.

डेक्कनच्या दिव्यांशू गायकवाड, अजय अहिरे व प्रशांत परदेशी यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटाच्या सामन्यात नॉईझ बॉईज एफसी, एएफए सॅनफोर्ड आणि सेंट्रल रेल्वे एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून तिसरी फेरी गाठली.

सविस्तर निकाल ः

दुसरी फेरी ः प्रथम आणि अव्वल श्रेणी – केपी इलेव्हनः 4 (अड्‌व्व्विवन फलेरो 22 मि., रोमारीओ लाझारथ 25 मि., अल्फ्रेड नागल 28, 30 मि.) वि.वि. युकेएम कोथरूड एफसीः 0, शिवाजीयन्स्‌ एससीः 1 (आयुश शेट्टी 25 मि.) वि.वि. गनर्स एफसीः 0, डेक्कन इलेव्हन एफसीः 3 (दिव्यांशू गायकवाड 19 मि., अजय अहिरे 55 मि., प्रशांत परदेशी 68 मि.) वि.वि. रूपाली एफसीः 0,

व्दितीय आणि तृतीय श्रेणी गट ः दुसरी फेरी – नॉईझ बॉईज एफसीः 5 (अक्षय दगाडे, हर्ष उत्तेकर, हर्षल गायकवाड, हृतिक गायकवाड, प्रतिक साबळे) टायब्रेकमध्ये वि.वि. एफसी बिच्डिनोहोः 4 (लव सुर्यवंशी, संजय अकोर्ले, सौरभ पाटील);(गोल चुकविलेः केदार काटणे); पूर्ण वेळ 0-0, एएफए सॅनफोर्डः 3 (ऍरॉन असिरवादम 2, 15, 43 मि.) वि.वि. युनिक वानवडीः 2 (ऍश्‍ले ए. 48 मि., ख्रिसबन नायर 56 मि.), सेंट्रल रेल्वे एफसीः 4 (रिचर्ड लाझरस 41 मि., ऋषिकेश शर्मा, थांग एम., गॅर्बिल डिकॉस्टा) टायब्रेकमध्ये वि.वि. सिग्मय एससीः 2 (यैमी वसाह 61 मि., क्‍युईस रिमी); पूर्ण वेळ 1-1.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)