पुणे – हॉटेल ‘रुपाली’च्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

अपहार, फसवणुकीसह बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

पुणे – फर्गसन रस्त्यावरील प्रसिद्ध रुपाली हॉटेलचा बेकायदा ताबा घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यवस्थापकाविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सलील श्रीराम शेट्टी (वय 34) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शशेंद्र सुंदर शेट्टी (रा. सहदेव हाईट्‌स, बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “शशेंद्र शेट्टी हॉटेल रुपालीची व्यवस्था सांभाळायचे. माझी आजी अप्पी श्रीधर शेट्टी यांनी 2011 ते 30 जून 2016 या कालावधीसाठी शशेंद्र यांच्यासह करार केला होता. त्यानंतर मुदत संपण्याअगोदर करार रद्द करण्याबाबत कायदेशीर नोटीस शशेंद्र यांना बजाविण्यात आली होती,’ असे सलील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. “त्यानंतर मी हॉटेलची व्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शशेंद्र यांनी मला मज्जाव केला. हॉटेल व्यवसाया संदर्भातील कागदपत्रे शशेंद्र यांनी स्वत:च्या नावावर करुन घेतली. आरोग्य विभाग, आस्थापना परवाना आदी कागदपत्रे शशेंद्र यांनी स्वत:च्या नावावर करुन घेतली होती. त्यासाठी त्यांनी बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर मी वेळोवेळी हॉटेलचा ताबा मागितला. मात्र, शशेंद्र यांनी ताबा सोडला नाही, तसेच हॉटेल व्यवसायातून मिळणारी रक्कम त्यांनी घेतली,’ असे सलील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार फसवणूक, अपहार तसेच अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)