पुणे – फाईन आर्टची ‘क्रेझ’ यंदाही कायम

तीन वर्षांच्या दहावी कलचाचणी अहवालातून स्पष्ट

पुणे – इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीच्या यंदाच्या अहवालावरून ललित कला आणि गणवेशधारी सेवा या क्षेत्राकडे सर्वाधिक कल असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र, गतवर्षी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल, वाणिज्य शाखेकडे होता. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचा कल काळानुसार बदलत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार करता “ललित कला’ला (फाईन आर्ट) विद्यार्थ्यांची पसंती कायम आहे.

शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, यासाठी 2016 पासून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. श्‍यामची आई फाउंडेशनच्या सहकार्यायातून कलचाचणी होत आहे. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी चाचणी घेण्यात येत आहे. वस्तुनिष्ठ प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून कलचाचणीद्वारे चाचपणी केली जात आहे.

कलचाचणीचा खरंच उपयोग होतो का?
दहावी कलचाचणी अहवालातून विद्यार्थ्यांचा कल लक्षात येत असला तरी त्याप्रमाणेच मुले करिअरच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची निवड करतात का, हा प्रश्‍न आहे. मेडिकल, इंजिनिअर, फार्मसी, स्पर्धा परीक्षा, आयटीआय या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असा पालकांचा आग्रह असतो. त्यात काही विद्यार्थी पालकांच्या आग्रहातून कलचाचणीच्या अहवालाकडे दुर्लक्ष घेत प्रवेश घेत असतात. तर काही मुलांना पालकांकडून आवडीनुसार प्रवेश घेण्याची मुभा असते. त्यामुळे कलचाचणीतून करिअर निवडणे ही प्राथमिक पायरी असली, तरी त्यानुसारच शैक्षणिक प्रवास सुरू करतात का? हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

असे आहेत वर्षनिहाय कल
2017- पहिल्याच वर्षी घेण्यात आलेल्या अर्थात 2017 मध्ये कलचाचणीत सर्वांत जास्त हा ललित कला म्हणजेच फाईन आर्टकडे होता.
2018 – दहावीनंतर विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे सर्वाधिक कल होता. यंदा मात्र वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी तिसरे प्राधान्य दिले आहे.
2019 – यंदा पहिल्यांदाच ललित कला बरोबरच पोलीस, लष्कर, निमलष्कर क्षेत्र असलेल्या गणवेशधारी सेवेकडे विद्यार्थ्यांनी दुसरे प्राधान्य दिले आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांनी सुयोग्य करिअर म्हणून पोलीस खाते आणि लष्करी सेवा हा पर्याय निवडल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी दहावी कलचाचणी अहवाल विद्यार्थ्यांना निकालाच्या दिवशीच जाहीर केला जातो. यंदा प्रथमच दहावी परीक्षा सुरू असतानाच हा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे दहावीनंतर पुढे काय, यावर मंथन करण्यास विद्यार्थी व पालकांना बराच वेळ मिळणार आहे. दहावीनंतर पुढे करिअरच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार करताना डोळसपणे निर्णय घ्यावा. कल, क्षमता आणि उपलब्ध असलेल्या संधीचा विचार करून पुढील शिक्षणाचा पर्याय निवडावा
– शीतल बापट, संचालिका, श्‍यामची आई फाउंडेशन.

ललिल कला म्हणजे काय?
1) दृश्‍यकला :
चित्रकला
शिल्पकला
डिझायनिंग
फोटोग्रॉफी
फिल्म मेकींग

2) सादरीकरण कला
नृत्य
संगीत
नाटक

3) उपयोजित कला
पाकशास्त्र
फॅशन डिझाईन
इंटेरिअर डिझाईन
जाहिरात
ग्रॉफिक डिझाईन
ऍनिमेशन
मल्टिमीडिया

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)