पुणे – मोटार वाहन न्यायालयात ‘पॉस’ मशिनची सुविधा

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात “मोटर वाहन न्यायालय’ येथे दंड भरण्यासाठी पॉस मशिनची सुविधा गुरूवारपासून सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा देणारे पुणे राज्यातील पहिले न्यायालय ठरले आहे.

या सुविधेद्वारे भरल्या जाणाऱ्या 2 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. मद्यसेवन करून वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, रॉंग वे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील तडजोड आणि विनातडजोड पात्र दावे न्यायालयात दाखल होतात. त्यातील दोषी वाहन चालकांकडून दरमहा सुमारे 25 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. हे सर्व पैसे पूर्वी रोख स्वरूपात स्वीकारण्यात येत. मात्र, आता यासाठी न्यायालयात तीन पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिन आधुनिक स्वरूपाच्या असून डेबिड कार्ड चालणार आहे.

इंटरनेट जोडणी नसल्याने मशिन बंद पडल्या, अशा तक्रारी येणार नसल्याचा दावा जिल्हा न्यायालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा न्यायालयात ई-पेमेंट आणि पॉस मशिनची सेवा देण्यात आली आहे. रोख स्वरूपातील पैशाची हाताळणी कमी करून पादर्शकता आणणे, हा या सुविधेचा उद्देश असल्याचे न्यायालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मोटर वाहन न्यायालयात महिन्याला साधारण अडीच ते तीन हजार खटले दाखल होत असतात.

पुण्यात सर्वाधिक खटले
पुण्यातील मोटार वाहन न्यायालयात राज्यातील इत्तर शहराच्या तुलनेत सर्वाधिक खटले जास्त आहे. न्यायालयात 50 हजार 284 खटले प्रलंबित आहेत. रोज साधारण 100 ते 150 जण दंड भरताता. जून महिन्यात 23 लाख 73 हजार रुपये न्यायालयाने दंड म्हणून आकारले आहे. आता हा दंड पॉस मशिनद्वारे भरण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)