पुणे – परीक्षा, मूल्यमापन पद्धतीत बदल अत्यावश्‍यक

विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीच्या शिफारशी


क्षमतांना चालना देणारी परीक्षा पद्धती विकसित व्हावी

पुणे – अभ्यासक्रम तयार करताना त्यातून विद्यार्थ्यांना काय मिळेल, (लर्निंग आऊटकम्स), त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज असून त्यादृष्टीने परीक्षा व मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल करणे अत्यावश्‍यक असल्याच्या शिफारशी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीने केल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने मूल्यमापन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आहेत, त्याचे अध्यक्ष भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे आहेत. देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधून पदवी व पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी रोजगारासाठी कुशल नसतात. हे चित्र बदलण्यासाठी महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता, कौशल्य, दृष्टीकोन, मिळालेल्या ज्ञानाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने समितीने आयोगाकडे शिफारशी केल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समितीच्या शिफारशींचा अहवाल दोन दिवसांपूर्वी आयोगाने प्रसिद्ध केला आहे. यावर शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, परीक्षा विभाग प्रमुख यांच्यासह सर्व संबंधितांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी दि. 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय स्तरावरही “लर्निंग आउटकम्स’ निश्‍चित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे उच्च शिक्षण स्तरावरही हीच पध्दत अवलंबण्यासाठी आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी मागील वर्षी दहा सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यासक्रम करताना काय काळजी घेतली पाहिजे, प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप कसे हवे, मूल्यमापनाची पद्धत कशी असावी याबाबत शिफारशी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे सातत्याने अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्यातील कमतरता लक्षात घ्याव्यात. त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यायला हवी. त्यादृष्टीने परीक्षा पद्धत विकसित करणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर कसे सोडविले, त्यासाठी कोणते तंत्र, कौशल्य वापरले, गुण किती मिळाले या प्रत्येक बाबीचा अभ्यास झाल्यास अध्यापनातील त्रुटीही पुढे येऊ शकतात, याबाबतीत सुधारणा सूचविल्याचे डॉ. साळुंखे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)