पुणे – तोतया पोलिसाने येमेनच्या नागरिकास लुटले

कोंढव्यातील घटना; परकिय चलनासह 2 लाख चोरले

पुणे – पोलीस असल्याचे सांगून कारमधून आलेल्या दोघांनी येमेनमधील एका नागरिकास 2 लाख 2 हजार रुपयांना लुटले. कोंढव्यातील कौसरबाग येथे रविवारी दुपारी हा प्रकार घडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अब्दुल करीम अलमेरी (वय-54, रा. कौसरबाग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 2 व्यक्‍तींविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलमेरी हे येमेन या देशातील रहिवासी आहेत. त्यांच्या बहिणीवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते पुणे येथे आले आहेत. रविवारी दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कौसरबाग भागातून जात होते. यावेळी कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. तसेच आम्ही पोलीस आहोत, असे सांगून त्यांनी फिर्यादींची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे असलेले अमेरिका, सौदी अरब येथील परकीय चलन आणि भारतीय रुपये असे एकूण 2 लाख 2 हजार रुपयांची रक्‍कम काढून घेत तेथून धूम ठोकली.

आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते. त्यांनी निळ्या रंगाचे शर्ट-पॅन्ट परिधान केले होते. तसेच खांद्यावर दोन स्टार होते, अशी माहिती फिर्यादींनी दिली आहे. त्या वर्णनावरून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)