‘माळेगाव’च्या एफआरपीचा प्रश्‍न पेटणार?

शेतकरी कृती समिती आक्रमक : तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा


आडसाली ऊस संपल्याशिवाय गेटकेन घेऊ नये

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाची एकरकमी एफआरपी सभासदांना आदा करावी तसेच आडसाली ऊस संपल्याशिवाय गेटकेन घेऊ नये, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माळेगाव शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

माळेगाव शेतकरी कृती समितीच्या वतीने कारखान्यात वेळोवेळी निवेदने देऊन याबाबत कारखाना प्रशासनास सजग केले आहे. मात्र, कारखान्याला याचे गांभीर्य नाही माळेगावच्या सभासदांना कायद्याप्रमाणे उसाचे गाळप झाले पासून 14 दिवसांच्या आत एक रकमी एफआरपी मिळणे बंधनकारक आहे. मात्र, कारखान्याकडून कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, ही बाब गंभीर आहे. शेतकरी कृती समितीच्या वतीने याबाबत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे व राष्ट्रवादीचे नेते तथा माळेगावचे विरोधी संचालक मदन देवकाते, योगेश जगताप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे असे विद्यमान चेअरमन सांगतात तसेच उपपदार्थ निर्मितीमधून देखील कारखान्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे स्त्रोत आहेत असे असतानाही एफआरपीची 2768 रुपये देण्याऐवजी फक्‍त 2215 रुपये देऊन सभासदांची बोळवण केली जात आहे. यंदा दुष्काळाचे सावट आहे विहिरींचे पाणी कमी होत आहे. नीरा डावा कालव्याचे पाणी देखील वेळेत मिळत नाही त्यामुळे सभासदांसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. याची दखल घेत कारखान्याने आडसाली ऊस संपेपर्यंत गेटकेन साठी वाहने कार्यक्षेत्र बाहेर काढू नयेत तसे झाल्यास शेतकरी कृती समिती याबाबत आक्रमक भूमिका घेईल असेही शेतकरी कृती समितीच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सभासदांचा 3700 एकर ऊस शेतात उभा आहे. सभासदांचा उस शेतात उभा असताना घेतला प्राधान्य देणे हे चुकीचे धोरण आहे. महाराष्ट्रातील इतर कारखाने एफआरपीच रक्कम एकरकमी आदा करीत आहेत. मात्र, राज्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून माळेगावची ख्याती आहे असे असताना एफआरपी एकरकमी देण्यात माळेगाव मागे का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी तानाजी कोकरे संभाजी होळकर, संदीप जगताप, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

“माळेगाव कारखान्याचा कारभार अंदाधुंद स्वरूपाचा आहे. स्वतःला ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ समजणाऱ्या कारखान्याच्या कारभाऱ्यांच्या नियोजनात अभाव आहे. त्यामुळे आडसाली उसाचे गाळप देखील फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील अशी अवस्था आहे. उसाचे गाळप उशीर झाल्याने टनेज घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. चेअरमन विरोधात असताना आकडे हिशोब यांचे गणिते मांडत होते. एक रकमी एफआरपीची मागणी करत होते. कारखान्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे असे वारंवार सांगितले जात आहे. असे असेल तर सभासदांची एफआरपीची रक्कम एकरकमी का दिली जात नाही. कारखान्याची विस्तरवाढ होत असताना यंत्रसामुग्री येण्यास उशीर होत आहे. त्यावरून कारखान्याचे आर्थिक नियोजन लक्षात येते.वाजांनकट्यात दोष उधळून आला आहे. रिकव्हरी नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी काटा मारण्याचे षड्‌यंत्र कारखान्याने केले आहे.
– योगेश जगताप, माजी नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)