नागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट

राजगुरूनगर – नागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राज्यात सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी बिरदवडी (ता.खेड) येथे केले. पीएमआरडीएच्या माध्यमातून 12 कोटी 44 लाख रुपये खर्चाच्या भामफाटा-बिरदवडी-आंबेठाण-महाळुंगे इंगळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन त्यांचे हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, दिलीप मेदगे, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, चांगदेव शिवेकर, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे किरण गित्ते, रिनाज पठाण, शाम कुंभार, राजेंद्र लोखंडे, कालिदास वाडेकर, राजन परदेशी, रामदास मेदनकर, अमृत शेवकरी, दिलीप वाळके, सुनील देवकर, सरपंच मंदा लोखंडे, गणेश मांडेकर, आशा पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच राजगुरुनगर दौऱ्यादरम्यान चासकमान धरणातून पाणी योजनेचे भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रिमोटच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी या प्रकल्पाच्या मॉडेलची पाहणी त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)