मलठण खूनप्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

शिरूर – मलठण (ता. शिरूर) येथे आठवड्यापूर्वी झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत उलगडा केला. खून करणारा तरूण आपली पोलिसांत तक्रार देईल, या भीतीने दोन तरुणांनी त्यांच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

वाघ व कळस्कर यांना शिरूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुठलाही सुगावा व पुरावा नसताना शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी केवळ पाच दिवसांत दोन आरोपींना जेरबंद केले. याप्रकरणी सनी ऊर्फ शरद रमेश वाघ (वय 23) व त्याचा साथीदार मंगेश ऊर्फ अनिल आनंदा कळसकर (दोघे रा. मलठण, ता. शिरूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 17) रोजी दत्तात्रय दादाभाऊ कोठावळे यांचा मृतदेह मलठणजवळील शेतात आढळून आला होता. हा खून असल्याचा संशय पोलिसांना होता. मलठण येथील शेतामध्ये दत्तात्रय कोठावळे याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शेतमालक सदाशिव नानाभाऊ वाव्हळ यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण संशयास्पद असल्यामुळे शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी तपासकामाला गती दिली.

बातमीदार व तांत्रिक मदतीच्या सहायाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. सर्व माहितीची शक्‍यता पडताळून शरद वाघ व मंगेश कळसकर या आरोपींना अटक केली. (दि. 16) जानेवारी रोजी दत्तात्रय कोठावळे याची मोटरसायकल, मोबाइल व रोख रक्‍कम बळजबरीने चोरी केली होती. त्यानंतर कोठावळे यांनी आरोपींना भेटल्यानंतर मी तुम्हाला ओळखले आहे असे सांगितले. हा आपल्या विरोधात पोलीस स्टेशन येथे तक्रार देईल, या भीतीने दत्तात्रेय कोठावळे यास जवळच्या शेतात नेऊन त्याच्या डोक्‍यात दगड टाकून त्याचा खून केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके करीत आहे.

पोलीस निरीक्षक कैलास घोडके, सहायक पोलीस निरीक्षक धोंगडे, पोलीस हवालदार पाटमास, पोलीस हवालदार साबळे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक कुडेकर, पोलीस नाईक शेळके, पोलीस नाईक संतोष औटी, पोलीस कॉन्स्टेबल साळवे, जारवाल, पालवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)