माजी सरपंच शिवदास उबाळे यांची माहिती
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली (ता. हवेली) येथील सर्व ग्रामस्थांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार यांनी सर्व गावातील लोकांसाठी A P L खालच्या लोकांना गहू व तांदूळ रेशन दुकानदाराच्या मार्फत वितरनसाठी उपलब्ध करून दिले असून यामध्ये जे केशरी कार्ड धारक आहे. त्यांना ज्यांचे ऑनलाईन नोंदणी असू किंवा नसू त्यांना अशा सर्व केशरी कार्डधारक यांना सवलतीच्या दरामध्ये मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी धान्य उपलब्ध करून दिले असल्याची माहिती माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिली आहे.
धान्य वाटप काळात सुरक्षित अंतराचे पालन व्हावे,या पार्श्वभूमीशनिवार रेशन दुकानदार प्रथम लाभार्थी यांचे घरोघरी जाऊन धान्य खरेदीची पावती बनवतील आणि त्यानंतर वाटप वेळा पत्रक प्रमाणे धान्य रेशन दुकाना तून उपलब्ध करून देणार आहेत.
गहू-8 रु. प्रति किलो तांदूळ-12 रू प्रति किलो कार्ड वरील प्रति व्यक्तीसाठी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. तसेच अन्तोदय व अन्न सुरक्षा लाभार्थी ला धान्य वितरीत केले जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच रोहिणी गोरे, मंडल अधिकारी किशोर शिंगोटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.