माजी विद्यार्थ्यांकडून मिनरल वॉटर प्लॅन्ट भेट

वाघोली  – येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वि. शे. सातव हायस्कूलमध्ये 1994 च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला मिनरल वॉटर प्लॅन्ट भेट देण्यात आला. 1994 दहावी या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 9 डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात एन. के. निंबाळकर यांनी शाळेतील मुलांसाठी शुद्ध पाणी मिळण्याची सोय करण्याची मागणी केली होती. या माजी विद्यार्थ्यांनी ही गोष्ट मान्य केली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी नियोजन करून आणि शाळेची गरज लक्षात घेऊन, एक हजार लिटर क्षमतेचा पाणी शुद्ध करणारा फिल्टर आज (दि. 29) जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शाळेला हस्तांतरित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाला संस्थेचे उपसचिव एल. एम. पवार, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक रावसाहेब आवारी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक पिरजादे, विशेष कार्यकारी अधिकारी निबाळकर, शाळेचे मुख्याध्यापक वाघचौरे, वाडेकर, भुतकर यांसह 1994 दहावीच्या बॅचच्या वतीने विकास शिंदे, अतुल शिंदे, रशीद शेख, संतोष हिरामण सातव, प्रदीप उबाळे, कुमार राजगुरू, जयश्री पाबळे, शोभा कराड, हरिभाऊ पाचारणे, राजकुमार तूपसमुद्रे, भारती आळेकर, उज्ज्वला आव्हाळे, सुचित्रा गायकवाड, सागर चव्हाण, संपत वागसकर, पांडुरंग गोरे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)