शिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या

संग्रहित छायाचित्र...

कवठे येमाई – शिरुर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कडाक्‍याच्या थंडीची लाट कायम आहे. या भागातील गावांगावात सकाळी व रात्रीच्या सुमारास शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील आठवड्यापासून कमालीची थंडी वाढल्याने हुडहुडी भरली आहे. उतरेकडील बदलत्या वातावरणामुळे राज्यात व तालुक्‍यात थंडी जास्त प्रमाणात जाणवत आहे.

अडगळीत पडलेले उबदार कपडे बाहेर काढले आहेत. दिवसाही सावलीत कमालीची थंडी जाणवत आहे. ही थंडी रब्बी हंगामातील पिकासाठी षोषक असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. ठिकठिकाणी नागरिक घराच्या आसपास शेकोटी पेटवून गप्पागोष्टी करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बागायत भागात थंडी जास्त जाणवत आहे. तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, शिक्रापूर, कासारी, कोंढापुरी, करंदी, जातेगाव, मलठण, वाघाळे, बुरुजवाडी, कवठे येमाई, चाडोह आदी गावांमध्ये थंडी जाणवत आहे. बागयती भागातील शेतकरी ही थंडी पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)