युतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे

‘त्या’ भेटीचे विनाकरण राजकारण

राज ठाकरे यांच्या घरात मंगलमय वातावरण आहे. त्यामुळे त्यांची भेट होणे यात काही नवल नाही. मात्र काहीजण उगीचच त्यांच्या भेटीचे राजकारण करीत आहेत. भावनिक कौटुंबिक भावनेतून त्यांच्या भेटीकडे पहिले पाहिजे.

राजगुरूनगर -आजच्या घडीला काही लोक युती कुठे वळणार आहे. याबाबत ते स्वतःचे गिअर बदलण्याच्या स्थितीत आहेत, असे वक्‍तव्य शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजगुरुनगर येथे समोर आणले आहे.
नीलम गोऱ्हे या नाशिक येथे पत्रकार दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी जात होत्या यावेळी त्यांनी राजगुरुनगर येथील शिवसेना शाखेला भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होत्या.

डॉ. गोऱ्हे यांना राज्यात युती होणार का नाही याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि, शिवसैनिकांची भावना लक्षात घेवून युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. 23 जानेवारीच्या बैठकीतील ठराव अजून अबाधित आहे. आजच्या घडीला युतीच्या वळणावर अनेकजण त्यांच्या सोयीनुसार गियर बदलत आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा ऐतिहासिक निर्णय आहे.

फेक न्यूजचे आव्हान

पुण्यात पत्रकार सुरक्षित आहेत. तरीही पत्रकारांचे अपघात आणि आजार याबाबत सरकारने चांगली भूमिका घेणे गरजेचे आहे. फेक न्यूजचे पत्रकारीतेला आव्हान आहे. खरी आणि चांगली बातमी पत्रकारांनी दिली पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व शिवसैनिक भगव्याच्या पाठीमागे जातील. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांनी अनेक घोटाळे केले आहेत आहेत. जनतेची फसवणूक केली आहे. बेगडी धर्मनिरपेक्षता समाजात ते दाखवत आहेत.

तलाक सारख्या मुद्‌द्‌याला त्यांनी विरोध केला मुस्लीम आरक्षणाला विरोध केला. मुस्लीम जनतेची दिशाभूल करण्याचे काम ते करीत आहेत. अतिंम निर्णय शिवसैनिकांच्या इच्छेनुसार उद्धव ठाकरे घेतील.

शबरीमाला मंदिराबाबत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जिथ पर्यंत पुरुषवर्ग भाविक मंदिरात जाऊ शकतो. तिथपर्यंत महिला देखील जाऊ शकतात. शिवसेनेची भूमिका प्रबोधनकारी, हिंदुत्वाची आहे. सरकारने निर्णयाची अंमलबजावणी केल्याने मंदिर अपवित्र झाल्याचे गैरसमज निर्माण झाले आहेत. मंदिर अपवित्र झाले ही भावनाच चुकीची आहे. देव हा प्रवित्रच असतो. देव अपवित्र होतो हीच भूमिका कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मानवी धर्म स्री पुरुष आहे. शबरीमाला मंदिरात महिला प्रवेश झाला पाहिजे. मात्र तेथे भाजप पक्ष विरोध करीत आहे. देशात काही ठराविक मंदिरे आहेत. तिथे असे प्रकार होत आहेत. कुठेतरी दुजाभाव केला जात असल्याची पंतप्रधानाची भूमिका वाटते.

राज्यात महिलांना संरक्षण मिळावे, महिला बचत गटातून रोजगार मिळाला असला तरी राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटावेत, दुष्काळग्रस्तांना मदत झाली पाहिजे. एका बाजूला सुधारणा तर दुसऱ्या बाजूला सरकारचे दुर्लक्ष आहे यात बदल झाला पाहिजे. दुष्काळाचे संकट राज्यावर आले आहे त्यासाठी प्रभावी उपयोजना होणे गरजेचे आहे. राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही सततच आग्रही आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)