पत्रकारदिनीच “प्रभात’चे वार्ताहर रोहिदास डोंगरे यांचे निधन

बेल्हे -आळेफाटा (ता. जुन्नर) येथील दैनिक प्रभातचे वार्ताहर रोहिदास विठ्ठल डोंगरे (वय 49) यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. पत्रकार दिनीच त्यांचे निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे. तर डोंगरे यांचा अंत्यविधी सोमवार (दि. 7) सकाळी त्यांच्या मूळ गावी बेल्हे (तांबेवाडी) येथे करण्यात येणार डोंगरे हे दैनिक प्रभातमध्ये आळेफाटा येथे वार्ताहर म्हणून काम करीत होते.

आज (रविवार) दुपारी आणे येथील रंगदास स्वामी महाराजाच्या वार्षिक यात्रोत्सवाचे त्यांनी पत्रकार मित्रांसोबत वार्तासंकलन केले. सायंकाळी साळवाडी येथे राहत्या घरी त्यांना छातीत त्रास होऊ लागला. त्यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्यात ते जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

मूळ बेल्हे (तांबेवाडी) येथील रहिवासी पण व्यवसायासाठी बोरी- साळवाडी येथे रहिवासी झालेले रोहिदास डोंगरे यांची व्यवसाय आणि पत्रकारितून परिसरात ओळख होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. डोंगरे यांचे लहानपणीच पितृछत हरपले होते. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक भाऊ, चार मुली, दोन जावई, असा परिवार आहे.

जुन्नर तालुक्‍यातील जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ, जुन्नर तालुका पत्रकार संघ, जुन्नर प्रेस क्‍लब आणि अन्य पत्रकारांनी एक सहकारी पत्रकार दिनीच हरपला गेला, अशा भावना व्यक्‍त करीत पत्रकार रोहिदास डोंगरे यांना आदरांजली वाहिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)