शिवशाहीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

महाळुंगे इंगळे – भरधाव निघालेल्या शिवशाही बसच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र, उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आज (शनिवारी) रात्री उशिरा बस चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित बाळासाहेब मोहिते (वय 24, रा. मोशी, ता. हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. मोहिते याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नाशिक आगाराचा शिवशाहीचा बसचालक सचिन विठ्ठल सुरवसे (वय 27, रा. नाशिक) याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावरील कुरुळीत शुक्रवारी (दि. 28 डिसेंबर 2018) सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवशाही बस (एमएच 14, जी. डी. 8440) पुण्याकडून चाकणकडे भरधाव वेगात निघाली होती. त्यावेळी कुरुळी हद्दीत अभिजीतच्या मोटार सायकलला (एमएच 10 डीइ 8570) बसची जोरदार धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान त्याच मृत्यू झाला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)