वाहतूककोंडीने आंळदीकरांचा श्वास कोंडला

अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरण, अस्ताव्यस्त पार्किंग ठरतेय कारणीभूत

आळंदी – तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत येथील प्रदक्षिणा मार्गावर लक्ष्मीमाता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पोलीस ठाण्याजवळ) रस्त्याच्या रुंदीकरण, सिमेंट कॉंक्रिटीकरण, रस्ता रुंदीकरण, ड्रेनेज, पाइपलाइन व रस्ता दुरुस्तीच्या काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम सुरू करताना या रस्त्यावरील अतिक्रमणे न हटविल्याने आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे आळंदीचा श्‍वास वाहतूककोंडीने कोंडला गेला आहे. तर वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करा, असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बंद करण्यात आलेला लक्ष्मीमाता चौक ते आळंदी नगरपरिषद चौक हा मुख्य मार्ग असल्याने येथे अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. यामुळे लक्ष्मीमाता चौकातून पालिकेपर्यंत येण्यासाठी सुमारे दीड किमीचा उलटा प्रवास करुन यावे लागते, त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असल्याने प्रदक्षिणा मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा सर्व कोंडमारा याच मार्गावर होत असल्याने तासन्‌तास वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. त्यात आणखी भर म्हणून प्रदक्षिणा मार्गावर वऱ्हाडी मंडळी व भाविक हे रस्ता रिकामा दिसेल त्याठिकाणी आपली वाहने पार्क करून इच्छीतस्थळी जातात त्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून खाली नवीन भाजी मंडईकडे व खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा छोट्या-मोठ्या हातगाड्या, टपऱ्या, कॉट व इतर 3 ते 4 चाकी छोटी-मोठी वाहनांची सर्रास पार्किंग होत असल्याने या मार्गावरून जाण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत असल्याने आळंदीकर विकासमांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वैतागले असून नको तो विकास असे म्हणू लागले आहेत तरी संबंधित विभाग गप्पा असा सवालही नागरिकांनी उपस्थित
केला आहे.

“अतिक्रमणांनी व्यापलेला संपूर्ण परिसर खंडोबा मंदिरापर्यंत मोकळा करण्यात यावा व याठिकाणी स्थानिक प्रशासनाने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अतिक्रमण मोहीम राबविण्यात यावी, अन्यथा नगरपालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागेल.
– वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा, आळंदी नगरपालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)