लाचखोरीचा मुळशी ‘पॅटर्न’

एक कोटीचे प्रकरण ताजे असतानाच भूगावातील महिला तलाठीसह कोतवाल जाळ्यात


महसूल विभागाच्या भ्रष्टाचाराच्या कारनाम्याने मुळशीची “अब्रू’ वेशीवर

‘मलईदार’ चरण्याचे कुरण

“मुळशी पॅटर्न’ च्या कारनाम्यामुळे मुळशी तालुका सद्याला चर्चिला जात असून येथील जमिनीच्या वाढत्या किंमतीमुळे मिनी महाबळेश्‍वर म्हणून परिचित असलेला मुळशी हिरवागार परिसर “मलईदार’ चरण्याचे कुरण ठरले आहे. यामध्ये अनधिकृतपणे लाच स्वीकारणे, भ्रष्टाचार करणे आदी प्रकारच्या गोष्टी घडू लागल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे/बावधन – मुळशीच्या तहसीलदारांसह कथित पत्रकार एजंटाला 1 कोटीच्या लाचप्रकरणात कारवाई करुन अटक केलेची घटनेला पाच दिवस होत असताना मुळशी तालुक्‍याच्या महसूल विभागाच्या महिला तलाठीने भ्रष्टाचाराचा अजून एक कारनामा केला आहे.

वारस नोंदीच्या प्रकरणात नाव नोंद व क्षेत्र नोंद 7/12 वर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला तलाठी आणि कोतवाल यांना रंगेहाथ पकडले. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी तीनच्या सुमारास भूगाव (ता.मुळशी) येथे घडली. त्यामुळे भ्रष्टाचाराचा या महसूल विभागाच्या भ्रष्टाचाराच्या “मुळशी पॅटर्न’ने मुळशीची “अब्रू’ वेशीवर आली आहे.

मनिषा सर्जेराज पवार (वय 37, तलाठी भूगाव) आणि विठ्ठल गुलाब सुर्वे (वय 37, कोतवाल भूगाव) अशी त्याची आरोपींची नावे आहेत. आज ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनाम बळप यांच्या सहकाऱ्यांनी भूगाव येथे सापळा रचून केली.

तक्रारदार यांचे क्षेत्र व वारस नोंदीचे प्रकरणात मुळशी तहसीलदार यांनी आदेश दिला होता. त्यानुसार भूगावमधील जमिनीच्या 7/12 वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला. तेव्हा तलाठी मनिषा पवार यांनी 50 हजार रुपयांची कोतवाल विठ्ठल सुर्वे यांच्यामार्फत लाच मागितली. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार आज भूगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. कोतवाल याच्या मार्फत तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दररोजच्या लाज स्वीकराण्याच्या घटनांमुळे मुळशी तालुक्‍यची “अब्रू’ वेशीवर टांगली गेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)