एसटी बस दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

महिला गंभीर जखमी : वडगाव पाटोळे येथील घटना

राजगुरूनगर – वडगाव पाटोळे (ता. खेड) येथे कडूस रस्त्यावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संदीप शेटे (वय 40, रा नवलाख उंबरे) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर श्रीमती शैला दादाभाऊ बच्चे (वय 35, रा. हेदृंज, ता. खेड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची माहिती अशी की, राजगुरुनगर आगाराची राजगुरुनगर-साबुर्डी ही एसटी बस (एमएच 14 बीटी 2820) ही कडूस रस्त्याने राजगुरुनगरकडे येत होती. तर याच रस्त्याने कडूसच्या दिशेने जाताना मोटार सायकल (एमएच 14 एजी 7636) यांची वडगाव पाटोळे गावाच्या जवळ समोरासमोर धडक झाली.

या अपघातात शेट यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्याच्या सोबत मोटरसायकलवरून जाणारी त्याची नातेवाईक शैला बच्चे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)