सामाजिक जाणीवेतून पोलिसांना माहिती द्या

संग्रहित छायाचित्र....

अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप जाधव : लोणी काळभोरला मेळावा

लोणी काळभोर – गतवर्षी कोरेगाव भीमा व परिसरात झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर जो अनुचित प्रकार घडला होता. त्याची पुनरावृत्ती येत्या एक जानेवारीला विजयस्तंभ परिसरासह इतरत्र घडू नये, यासाठी जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी यावर्षी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जाणीवेचे भान ठेवून आपापल्या हद्दीतील संशयास्पद हालचाली व अफवा पसरवणाऱ्यांची नावे पोलिसांना तत्काळ कळवावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव व परिसरात झालेल्या दंगलीला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या (दि. 1) जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील मधुबन कार्यालयात पूर्व हवेलीमधील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चेतन चोरबोले, गणेश पिंगुवाले, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, तंटामुक्‍त समितीचे माजी जिल्हा समन्वयक रघुनाथ चौधरी, पश्‍चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दादा काळभोर, जिल्हा महिला पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षा रोहिनी हांडे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांतील सर्व पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते.

संदीप जाधव म्हणाले की, पोलिसांना संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील प्रत्येक अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्‍यक साधने असणार आहेत. मात्र, तरीही पोलिसांना नागरिकांची मोठी मदत लागणार आहे. नागरिकांनी आपआपल्या हद्दीत घडणाऱ्या समाजविघातक हालचालींची माहिती पोलिसांना तत्काळ दिल्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना सोपे जाणार आहे.

या संदर्भात पोलिस पाटील व गावागावातील ग्रामसुरक्षा दलांची मोठी मदत पोलिसांना होणार आहे. समाजविघातक हालचालींची मागिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याने, नागरीकांनी आपापल्या हद्दीतील छोट्या मोठ्या समाजविघातक शक्तीच्या हालचालींची माहिती देऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मेळाव्यात ग्राम सुरक्षा दलातील तरुणांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पाटील व हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या हस्ते काठी व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. कुुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलींद कुंजीर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)