बारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद

भवानीनगर – बारामती एमआयडीसीत आरटीओ कार्यालयाजवळ थांबलेल्या एकाची रोकड लुटणाऱ्या दोन सराईताला बारामती गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी, पिस्तूल असा 14 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. (दि. 3) रोजी रशिद कमरूद्दीन खान (वय 26, बारामती) हे एमआयडीसीतील आरटीओ कार्यालयाजवळ थांबले होते.

त्यावेळी दोन सराईतांनी त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून रोकड 15 हजार 300 रुपये, 13 हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण 28 हजार तीनशे रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी फिर्यादी खान यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने या लुटमारीचा तपास सुरू केला.

राहुल चतुर्वेदी (वय 21, रा. माळेगाव, ता. बारामती), एक अल्पवयीन मुलाने ही लुटमार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींना जेरबंद करण्यासाठी आरटीओ परिसरात सापळा रचला. दोघे आरोपी या परिसरात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, हवालदार शिवाजी निकम, संजय जगदाळे, संदीप मोकाशी, सुरेंद्र वाघ, संदीप कारंडे, संदीप जाधव, अभिजीत एकशिंगे, सूरज अहिवळे, दशरथ कोळेकर, शर्मा, पवार, सदाशिव बंडगर यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)