मंचरमध्ये सदनिका फोडून 20 हजारांचा ऐवज लंपास

मंचर – मंचर शहरातील जुना चांडोली रस्त्यावरील वृंदावन हाऊसिंग सोसायटीमध्ये शरद बबनराव शिंदे यांच्या बंद सदनिकेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने मंगळवारी (दि. 8) दिवसाढवळ्या सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देवून पाहणी केली आहे. जुना चांडोली रस्त्यावर वृंदावन सोसायटीत अज्ञात चोरट्याने सदनिकेच्या दरवाजाचा कडीकोयंडा कटरने तोडून सदनिकेमध्ये असलेल्या बेडमध्ये असलेले कपाट तोडले आणि त्यातील कपडे अस्तव्यस्त करून त्यातील शालू, कुर्ता, समई, मनघटी घड्याळ, लहान बाळाच्या सोन्याच्या मनगटी, चांदीचे पैजण, कानातील सोन्याची रिंग आदी ऐवज चोरीस गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवल्याने मोठ्या प्रमाणात चोरीचा अनर्थ टळल्याचे शरदराव शिंदे यांनी सांगितले. याबाबत चोरीची फिर्याद मंचर पोलीस ठाण्याला शरद शिंदे यांनी दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ए. बी. मडके करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)