विद्यार्थी कारवाईच्या कचाट्यात सापडले

उरूळी कांचनमध्ये पोलिसांची धडक कारवाई : पालकांचीही भंबेरी

उरुळी कांचन – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी रोड तसेच डॉ मणिभाई देसाई कॉलेज परिसरात रोडरोमिओवर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहन चालवणाऱ्यांवर अल्पवयीन मुलांवर तसेच ट्रिपल सीट, लायसन्स न बाळगणारे, फॅन्सी नंबर प्लेटसह वाहनांवर कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उरुळी कांचन परिसरात जमिनीला सोन्यापेक्षा जास्त बाजारभाव असल्याने अनेक विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालयात तसेच डॉ. मणिभाई देसाई कॉलेजमध्ये हे दुचाकीवरून येतात. हे विद्यार्थी बेभान पद्धतीने वाहने चालवित आहेत. त्यामुळे हा त्रास मुलांना व गावकऱ्यांना होऊ लागला. हे प्रमाण वाढत गेले. पालकांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला गेल्यावर लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस नाईक सचिन पवार, संदीप देवकर, सोमनाथ चितारे, अमोल भोसले, बाळासाहेब गाडगे यांनी विद्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावर वाहनांची तपासणी केली.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांकडे लायन्स नव्हते. एका गाडीवर तीन ते चार जण बसलेले होते. काही दुचाकी वाहनांना नंबर प्लेट नसल्यामुळे हे चालक कारवाईच्या कचाट्यात सापडले. फॅन्सी नंबरच्या वाहनांवर कारवाई केली. हॉर्नचे विविध आवाज असलेल्या डझनभर वाहनांवर कडक कारवाई केली. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची भंबेरी उडाली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाहन चालक अलगद अडकले.

“लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आठवड्यात दोनवेळा कारवाई करणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडे लायन्स आहे का. तो दुचाकी कशी चालवितो. गाडीची नंबर प्लेट कशी आहे या सर्व गोष्टी पाहून पालकांनी आपल्या मुलांना वाहन द्यावीत. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाणार आहे.
– चेतन थोरबोले, सहायक पोलीस निरीक्षक, उरुळीकांचन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)