रोहित्राचे काम करताना वीज कामगाराचा मृत्यू

मंचर – सातगाव पठार-कोल्हारवाडी (ता. मंचर) येथे महावितरणाच्या वीज रोहित्राचे काम करत असताना वायरमन यशवंत तुकाराम सांडभोर (वय 57) यांचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि. 8) दुपारी घडली.

कोल्हारवाडी गावातील गाडगावस्ती येथे भास्कर विठ्ठल एरंडे यांना वीज रोहित्रावरच खाकी कपडे घातलेला इसम चिकटलेला दिसत असल्याचे गावाचे पोलीस पाटील शाम वामन एरंडे यांना कळवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामस्थ घटनास्थळी आले असता तेथे वायरमन यशवंत तुकाराम सांडभोर (मूळगाव सांडभोरवाडी, ता. खेड) हे रोहित्रावरच चिकटलेल्या अवस्थेत दिसून आले. स्थानिक नागरिकांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)