राज्यात 461 लाख टन उसाचे गाळप

संग्रहित छायाचित्र

पुणे – राज्यात सध्या गळीत हंगाम वेगात सुरू असून आत्तापर्यत 461.99 लाख टन उसाचे गाळप झाले असून 489.51 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत चालेल, अशी शक्‍यता आहे. यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गळीत हंगाम लवकर सुरू करण्यात आला होता. पण डिसेंबरपासून खऱ्या अर्थाने सर्व कारखाने वेगाने सुरु झाले. सध्या राज्यात 185 साखर कारखाने सुरु आहे. त्यातील 99 सहकारी व 86 खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

गेल्यावर्षी आत्तापर्यंत फक्‍त 411.21 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. तब्बल 424.50 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गाळपाचा वेग जास्त आहे. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत गाळप हंगाम सुरू होता. यंदा मात्र दुष्काळाची पार्श्‍वभूमी असल्याने हा हंगाम फार काळ सुरू राहणार नाही.

राज्यात सध्या पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे 62 कारखाने सुरू आहे. त्यात 31 कारखाने सहकारी व तितकेच खासगी कारखाने सुरू आहेत. याशिवाय कोल्हापूरमध्ये 36 तर नांदेडमध्ये 32 साखर कारखाने सुरू आहेत. अहमदनगर विभागात 28 तर औरंगाबाद विभागात 22 कारखाने सुरू आहेत. राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या नसल्या तरी आगामी काळात त्या होणार आहेत. उसाला पाणी कमी पडण्याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सध्या राज्यात उस तोडणी वेगात सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)