कुंजीरवाडीत घारीला जीवदान

लोणी काळभोर – कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील दोन तरुणांच्या प्रसंगावधानामुळे गंभीर जखमी असलेल्या घारीला जीवदान मिळाले. कुंजीरवाडी येथे राहणारे ऍम्ब्युलन्स चालक सचिन मोटे हे नेहमीप्रमाणे कामावर निघाले होते. त्यावेळी त्यांना उंच उडणारी घार जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. तो थोडी हालचाल करत होता. घार जिवंत असल्याचे पाहून त्यांनी उचलून बाजूला घेतले. निरखून पाहिले असता त्याच्या पंखाजवळ जखम झालेली दिसली. त्यामुळे तो उडू शकत नव्हता.

अशा अवस्थेत हा पक्षी तसाच सोडला तर मरुन जाईल. यामुळे मोटे यांनी याविषयी माहिती शिवसेनेचे हवेली संघटक स्वप्नील कुंजीर यांना सांगितली. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता स्वप्नील कुंजीर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब ढोले यांच्याशी संपर्क साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या जखमी घारीवर डॉक्‍टरांकडून उपचार करण्यात आले. त्यानंतर वनखात्याचे वनरक्षक नाना भोंडवे यांच्याशी संपर्क साधून ही जखमी घार वनखात्याच्या ताब्यात दिली. ऍम्ब्युलन्स चालक सचिन मोटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दादासाहेब ढोले, शिवसेना हवेली तालुका संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानमुळे दुर्मिळ घारीला जीवदान मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)