निघोजेत युवकाची आत्महत्या

File photo

महाळुंगे इंगळे -रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड कंटेनरच्या पाठीमागील हौद्याच्या लोखंडी शिडीला 27 वर्षीय युवकाने नायलॉन पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीतील डोंगरवस्ती येथे शनिवारी (दि. 5) रात्री उशिरा घडली. तर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने चाकण पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे.

रितेश उर्फ धनंजय बाबुराव कापरे (वय 27, रा. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विवेक शंकर कदम (वय 25, सध्या रा. निघोजे, मूळ, रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोंगरवस्ती येथे रस्त्यालगत एक मालवाहतुकीचा अवजड कंटेनर (एनएल 01, एबी 2080) उभा होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच्या पाठीमागील हौद्यास असलेल्या शिडीच्या लोखंडी गजास कापरेने मोटारकार फिटिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)