भटकळवाडी व पिंपळवंडी ग्रामसुरक्षा दलांचे काम उत्कृष्ट

आळेफाटा  – आळेफाटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमधून नेमण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलातील भटकळवाडी व पिंपळवंडी (ता. जुन्नर) ग्रामसुरक्षा दलांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भटकळवाडी ग्रामसुरक्षा दलास प्रथम, तर पिंपळवंडी ग्रामसुरक्षा दलास द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

भटकळवाडी ग्रामसुरक्षा दलाचे प्रमुख पोलीस पाटील संदीप कसबे आणि पिंपळवंडी गावचे पोलिस पाटील इरफानभाई तांबोळी आणि ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते यांना आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रसंगी पोलीस जमादार लहू हिरवे, शंकर भवारी, माजी पोलीस पाटील भिकाजी ताथवडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे, नितीन लेंडे, मच्छिंद्र भटकळ, मंगेश बारवकर, लक्ष्मण ताजणे उपस्थित होते. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने भटकळवाडी येथे सायरन देण्यात आले आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)