आळंदी प्रभाग 8मध्ये मूलभूत सुविधांच नाही

आळंदी – आळंदी नगरपरिषेद हद्दीतील देहुफाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 7 ते 9 मधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये निवडणूका झाल्यापासून आजतागायत बहुतांश रस्ते कच्चे असून ग्रामस्थांना पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. तसेच रस्त्यावर अपुरा वीज पुरवठा असून ती वारंवार खंडित होण्याची परंपरा ही कायम आहे.

तसेच येथील पाणी वाटपाची संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून, अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणी वेळेवर कधीच मिळत नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.

तरी येत्या 15 दिवसांत यात सुधारणा करून, नागरिकांना वेळेवर पाणी, सुसज्ज रस्ते व पुरेसा वीज पुरवठा न केल्यास नगरपरिषेदेसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लक्ष्मण कदम यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)