चाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार : भाडेकरुंची माहिती लपविली


गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांकडून कारवाईचा बडगा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाकण – भाडेकरूंची माहिती चाकण पोलीस ठाण्यात न देता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चाकण व परिसरातील 20 घरमालकांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. भाडेकरूंची माहिती न दिल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळू शकते, त्यामुळे आपल्या घरात ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती त्वरित सादर करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.

एकनाथ तबाजी शेळके (रा. जाधववाडी, चिखली), कमलेश ज्ञानेश्‍वर भोसले (रा. महाळुंगे इंगळे), बाळासाहेब सोपान येळवंडे (रा. निघोजे), संदीप अमृता खराबी (रा. खराबवाडी), विशाल गेनभाऊ कांडगे (रा. मार्केट यार्ड जवळ, चाकण), सचिन जगन्नाथ क्षीरसागर (रा. बलुतं आळी, चाकण), संदीप जगन्नाथ क्षीरसागर (रा. धाडगे आळी, चाकण), श्रीराम रामसहाय विश्‍वकर्मा (रा. बलुतं आळी, चाकण), पप्पू बद्रिप्रसाद बघेल (रा. बलुतं आळी, चाकण), तुषार बाळासाहेब खराबी (रा. खराबवाडी, चाकण), संतोष बबन नाणेकर रा. नाणेकरवाडी, चाकण), रामचंद्र भारू भोर (रा.अवसरी खुर्द, ता. आंबेगाव), अतुल बाळासाहेब गोरे (रा. मेदनकरवाडी, चाकण), रुपेश शांताराम जाधव (रा. नाणेकरवाडी, चाकण), संदीप बाबूराव जाधव (रा. नाणेकरवाडी, चाकण), नितीन गोरख घोजगे (रा. पुणे), सुदाम लक्ष्मण घोजगे (रा. जांबवडे, सुदुंबरे, ता. मावळ), कैलास राघू बवले (रा. महाळुंगे इंगळे), निवृत्ती बाबूराव सरोदे (रा. पिंपरी, पुणे), भीमा बबन पायगुडे (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घर मालकांची नावे आहेत.

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याबाबत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरपरिषद व परिसरातील ग्रामपंचायतींना 15 दिवसांपूर्वी कळविले आहे. तरी त्यास काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्यांचे फावते. अनेक गुन्हेगारांनी शेजारील राज्यातून बेकायदेशीर रित्या गावठी बनावटीचे पिस्तुल आणल्याने गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे यांनी भाडेकरूंची माहिती देण्याबाबत आदेश काढले आहेत. त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)