खाते, एटीएमविषयी कोणतीही बॅंक विचारत नाही

सायबर सेलचे वैभव साळुंखे यांचे प्रतिपादन

लोणी काळभोर – कोणतीही बॅंक आपल्या खातेदारांना खाते व एटीएम संबंधित माहिती विचारत नाही. त्यामुळे ही माहिती कोणालाही देऊ नका. याप्रकारचे फोन आल्यास तत्काळ आपल्या बॅंकेच्या शाखेशी, नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन पुणे सीआयडी सायबर सेलचे वैभव साळुंखे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त सायबर गुन्हे जनजागृती मोहीमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी उरुळी देवाची दूरक्षेत्राचे हद्दीतील किस्टोन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बॅंकिंग फ्रॉड व इतर मुद्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक यशोधन सोमण, प्राचार्य जालिंदर कसबे, पोलीस पाटील रोहिणी हांडे, होंडा कंपनीचे माजी संचालक, किस्टोन महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

साळुंखे म्हणाले की, फसवणूक होवू नये म्हणून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वतः स्वाइप करा. बॅंक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा. पासवर्ड कुणाला सांगू नका, पासवर्ड वारंवार बदला. एटीएममधून पैसे निघत नसल्यास बॅंकेशी संपर्क साधावा. सोशल नेटवर्किंग साइटवर अनोळखी व्यक्‍तीशी मैत्री करू नका.

ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर म्हणाले की, मोबाइल फोनवर अथवा संगणकावर फेसबुक अकाउंट सुरू करताना युजर आयडी व पासवर्ड कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. दुसऱ्याचे फेक फेसबुक अकाउंट काढणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील अशी कमेंट करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

आपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर आणि कुटुंबाची माहीती आदी सोशल मीडियावर शेअर करू नका. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह, भडकाऊ संदेश पाठवू नका आणि अश्‍लील चित्रफित व चित्रे पाठवू नका.

हा कायद्याने गुन्हा आहे. इंटरनेटवरून पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हीडीओ डाऊनलोड करू नका. नेट बॅंकिंग व ई-मेलचे पासवर्ड वरचेवर बदलत रहा. पासवर्ड किमान आठ अक्षरांचा असावा. त्यात इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकाचा समावेश असावा. असे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)