माजी सैनिकांच्या समस्या सोडविणार

मंचर – माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कर्नल के. एच. पाटील यांनी मंचर येथे भेट दिली. त्यांचे स्वागत भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी केले. यावेळी त्यांनी माजी सैनिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.

नौदलाचे कर्नल के. एच. पाटील आणि लेफ्टनंट कर्नल अक्षय सिंग राणा, सुबेदार झुंजे विलास, हवालदार अमरपाल, माजी सैनिक तानाजी कोरडे, गोपीनाथ कुटे, रामदास मेहेर, यशवंत गांजाळे, दत्तात्रय आरोटे, दशरथ डोंगरे यांनी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी 30 जानेवारी रोजी होणाऱ्या संमेलनाच्या आढावा बैठकीसाठी मंचरला आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी रविंद्र त्रिवेदी, साजिद सय्यद, उत्तम राक्षे, भाऊसाहेब लंघे, किरण वाळूंज, निलेश थोरात उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)