सासवड शहराची भुयारी गटार योजना मंजूर

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला

सासवड – शहराची 58 कोटी 13 लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार व मलनिस्सारण केंद्र या योजनेला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. यानंतर पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, यशवंत जगताप, दीपक टकले, सचिन भोंगळे समवेत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली दोन टप्प्यात आणि दोन वर्षांच्या आत नगरपालिकेला ही योजना पूर्ण करावयाची असून तीन महिन्यात योजनेची निविदा काढण्यात येणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिकेने या योजनेचा आराखडा केला असून 58 कोटी 13 लाख रुपयांच्या या योजनेत पहिला टप्पा 36 कोटी 53 लाखांचा आहे.

यामध्ये तीन एमएलडीचे आणि प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे 2 एसटीपी, 32 किलोमीटर पाइपलाइनच्या कामांचा समावेश आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 21 कोटी 61 लाख रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)