थंडीमुळे ज्वारी, फळबागा कोमात

गहू, हरभरा जोमात : निमसाखर परिसरातील शेतकरी चिंतेत

रब्बी पिकांची स्थिती बिकट

सध्या रब्बी हंगामातील पिकांची परिस्थीती सध्या बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पिके जलसंपदाचे पाणी शेतकऱ्यांना योग्य वेळी मिळाले नाही तर जळून जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जलसंपदा खात्याने निरवांगी व अन्य परिसरात आर्वतन तातडीने द्यावे, अशी मागणी शेतकरी सुहास गुरव यांनी केली आहे.

निमसाखर – इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील अनेक गावांमध्ये कडाक्‍याच्या थंडी तालुका गारठल्याचे चित्र आहे. मात्र, या थंडीमुळे गहु व हरभरा पिके जोमात आहेत. तर ज्वारी पिकांसह फळबागांना फटका बसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी व घोरपडवाडीसह अन्य भागामध्ये गेले काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे.

या परिसरामध्ये सर्वसाधारण 10 अंश सेल्सीअसपर्यंत पारा गेल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येते. कमी झालेल्या तापमानामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामातील काही मोजक्‍याच भागातील पिके जोमात असल्याचे पहावयास मिळत आहे.

मात्र, अनेक भागात वेगळेच असून रब्बी हंगामातील नीरा डाव्या कालव्यावरील पिके पाण्यावाचून जळण्याच्या मार्गावर आहेत, अशी भीषण परिस्थिती असून सध्या पडत असल्याने ज्वारी पिकांवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. दुसरीकडे हवेतील थंड वातावरणामुळे गहु व हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण आहे. यामुळे परिसरातील पिकांची परिस्थिती थोडीशी समाधानकारक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)