सासवड-गराडे मार्गाच्या साइडपट्ट्या निकृष्ट

सासवड – सासवड-गराडे रस्त्याची दुरुस्ती आणि साइडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. या कामात मुरूमा ऐवजी माती मिश्रीत खडीचा वापर केला जात असल्याचे समारे आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पुणे-सातारा महामार्गाकडे जाण्यास सोईचा मार्ग असल्यामुळे सासवड-गराडे मार्गे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत खडीचा वापर केल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचा शक्‍यता वर्तवली जात आहे. या कामात वापरली जाणारी माती मिश्रीत खडी ही आधीच्या कामातून उरलेली रस्त्याच्या बाजूला पडलेलीच खडी कंत्राटदार वापरत आहेत. तसेच साइडपट्ट्या भरण्यासाठी वापरला जाणारा मुरुम अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि मातीमिश्रीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी कार्यालयात गैरहजर होते. तालुक्‍यातील बांधकाम विभागातील गलथान कारभार सध्या तालुक्‍यात चर्चेचा विषय बनला आहे.

“सासवड-गराडे रस्त्याच्या दुरूस्ती आणि साइडपट्ट्या भरण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामात वापरले जात असलेल्या निकृष्ट खडी आणि मुरुम याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
– डी. आर. गायकवाड ,अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)