सफाई कामगाराची आत्महत्या

File photo

मंचर – येथील सफाई कामगार काळुराम कचरु गायकवाड (वय 40) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 6) पहाटे उघडकीस आली आहे. मंचर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे. मंचर-बेंडेमळा येथ काळुराम गायकवाड हे पत्नी मुलांसह राहत होते. मार्केटयार्ड परिसरात ते सफाई कामगार म्हणून काम करीत होते.

गायकवाड हे शनिवारी रात्री कामावरुन आले. त्यानंतर जेवण केल्यानंतर सर्वजण एकाच खोलीत झोपले. पत्नी विद्या गायकवाड यांना रात्री सव्वा एक वाजता जाग आली असता गायकवाड हे बिछाण्यावर नव्हते. शोध घेतला असता लोखंडी अँगलला त्यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)